चंद्रसेनेचा राज्याभिषेक
खूप जुनी गोष्ट आहे ही. पुष्पद्वीप नांवाचा मोठा देश होता. त्याचा राजा होता अनंतकुमार. त्याला एकच मुलगी होती. तिच नांव चंद्रसेना.
चंद्रसेना हुषार होती, खेळकर होती, गुणाची होती. घोडेस्वारी आणि भालाफेकीत तरबेज होती. पण तिला एक खोड होती. गणिताचा अभ्यास तिला अजिबात आवडत नसे. गणित शिकवणारे शिक्षक आले की, तिच्या सबबी सुरु झाल्याच. कधी तिला झोप येत असायची, तर कधी तिचा लाडका घोडा शेरु आजारी असायचा. खुद्द महाराणी पुष्पावती यांनी तिला गणित शिकवण्याचा प्रयत्न केला| पण चंद्रसेनेच्या सबबी वाढतच गेल्या.
महाराज अनंतकुमार चिंतित झाले आणि क्रोधित झाले. चंद्रसेना त्यांची एकुलती एक मुलगी होती, त्यांच्यानंतर राज्य सिंहासनावर तीच बसणार होती - राज्यकारभार करणार होती. पण अनंतकुमारांची पक्की धारणा होती की, ज्याला गणित येणार नाही. त्याला राज्यकारभार कांय येणार? गणित नीट शिकल्याशिवाय ही राज्य करायला लागली तर राज्य बिघडून ठेवील| शेवटी राजाने घोषणा करुन टाकली - जर चंद्रसेना नीटपणे गणित नाही शिकली तर तिला राज्य मिळणार नाही.
पुढे वाचा
रविवार, 4 नवंबर 2007
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
1 टिप्पणी:
very nice, its truly beneficial to motivated somebody.!!!
एक टिप्पणी भेजें